विकासासाठी जनतेसोबत : खा. नारायण राणे

Jul 11, 2024 - 10:18
Jul 11, 2024 - 14:21
 0

रत्नागिरी : तुमच्यामुळेच मी खासदार आहे. रत्नागिरीकरांनी केलेल्या सत्कार अतिशय महत्त्वाचा आहे. आता सत्कार बंद पाच वर्षांत केवळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. येथील प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न बाइले पाहिजे. येथे प्रकल्प आले पाहिजेत. बेरोजगारी दूर झाली तरच रत्नागिरीतील कुटुंबे सधन होतील. त्यातून शैक्षणिक आरोग्य सुरत्ता मेईल. आपला खासदार उपद्रव करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी आहे. परंतु कोण तुमचा छळ करत असेल तर त्याला सोडणार नाही. यापुढे रत्नागिरीत बुल्म, मस्ती बंद. अडचणी आल्यास एक फोन करा, खासदार तुमच्या सोबत असेल, असा अप्रत्यक्ष इशारा खा. नारायण राणे यांनी दिला.

 जिल्हा भाजप दक्षिण यांच्यावतीने वि. दा. सावरकर नाट्यगृहात खा. राणे यांच्या सरकार सोहळा व आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा नेते नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, जिल्हा सरचिटणीस सतेज नालावडे, भाजपा नेत्या उल्का विश्वासराव, ऐश्वर्या जठार, रवींद्र नागरेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद अधटराव, माजी उपनगराध्यक्ष आशिष खातु, अॅड, विलास पाटणे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खा. राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना राज्यांच्या गजरात घोषणा देत खा. राणे यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना खा. राणे म्हणाले, माझ्या विजयाचे मानकरी आपण सर्वजण आहेत. आजचा सत्कार हा घरातला आहे. यामुळे मी सत्कार स्वीकारागार नसून मतदारसंघाच्या विकासासाठी काम सुरू करणार आहे. येथील प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. कुटुंबात पैसा आला तरच शिक्षण व आरोग्य योग्यप्रकारे मिळू शकते, उत्तम शिक्षणामुळेच तरुणांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे तुम्हाला लागणारी ताकद द्याला मी तयार आहे. राजकारणात आल्यापासून मी केव्हाही जात, धर्म पाहिला नाही. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाने मी काम करीत राहिलो. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सर्वात जास्त पदे दिली त्या पदांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केल्याचे राणे यांनी सांगितले.

यापुढील पाच वर्षात आपल्याला केवळ मतदारसंघाचा विकास करायचा आहे. राजकारण बाजूला करून सर्वांनी कोकण म्हणून एकत्र आले पाहिजे विकासासाठी कोकणची एकजूट दिसली पाहिजे. रत्नागिरीचे प्रश्न मला चांगले माहीत आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत, नद्यांच्या गाळउपसा, संरक्षक भिंतींची कामे पुढील में महिन्याच्या पूर्वी पूर्ण होतील. राणे जो शब्द देतात तो पाळतात, हा इतिहास आहे. याहीपुढे अशीच कामे आपण करणार आहोत. तुम्ही फक्त माझ्या पाठिशी उभे रहा, असे आवाहन खा राणे यांनी केले. निवडणूक संपली आपण विजयी झालो. ज्यांनी आपल्याला मते दिली त्यांचेही आभार ज्यांनी नाही दिली त्यांचेही आभार मी मानत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचाही माझ्या विजयामध्ये मोठा वाटा आहे, असेही खा. राणे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow