खेड : नगरपालिकेकडून घरोघरी डास प्रतिबंधक फवारणी

Jul 11, 2024 - 14:29
 0
खेड : नगरपालिकेकडून घरोघरी डास प्रतिबंधक फवारणी

खेड : खेड शहरात डेंगी साथीचा फैलाव होऊ नये याकरिता सतर्क झालेल्या नगरपालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी केली. गेल्या काही दिवसांपासून पालिकेने घरोघरी डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती निर्माण होऊन डेंगीची साथ डोके वर काढू शकते अशा भागांवर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय शहरातील मोक्याच्या ठिकाणी व डोअर टु डोअर डास प्रतिबंधक फवारणी केली जात आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे जगबुडीच्या पुराचे पाणी मटण मच्छीमार्केटमध्ये घुसले होते. यामुळे या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता गृहित धरत मटण-मच्छीमार्केट परिसरातही डास प्रतिबंधक फवारणी केली. विशेषतः साठे मोहल्ला, पोत्रिक मोहल्ला परिसरात डेंगी साथीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. यामुळे या ठिकाणी डोअर टु डोअर डास प्रतिबंधक फवारणी करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. ही मोहीम आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow