Maharashtra Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

Jul 12, 2024 - 10:53
 0
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

◼️ ११ वाजेपर्यंत १२४ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला

➡️ आज १२ जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान हे मतदान पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मतदान हे गुप्त पद्धतीने असल्याने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या विधान परिषद निवडणुकी प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रत्येकी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे २३ मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील.

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
11:21 12-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow