संगमेश्वर : तुळसणीत बचतगटांकडून सामूहिक हळद लागवड

Jul 12, 2024 - 12:04
Jul 12, 2024 - 15:06
 0
संगमेश्वर : तुळसणीत बचतगटांकडून सामूहिक हळद लागवड

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी येथील श्री दत्त कृपा, श्री जुगाई आणि श्री कुलस्वामिनी या तीन महिला बचत गटांतील सुमारे ३० महिलांनी एकत्र येत आग्रेवाडी याठिकाणी हळद पिकाची सामूहिक पद्धतीने लागवड केली आहे. या महिलांना एकत्र आणून हा शेतीविषयक स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी संगमेश्वर तालुका ऍग्रो स्टार फार्म फ्रेश प्रोड्युसर कंपनी लि. यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

कोकणात सद्या शेतीचे प्रमाण खूप कमी झालेले पहायला मिळते. केवळ उदरनिर्वाहसाठी काही श्रमिक शेतकरी शेती करताना दिसतात आणि बाकी कालावधीत शेत जमीन अशीच पडून असते. योग्य पाणी व्यवस्था असेल तर शेतात नवनवे प्रयोग करून बारमाही पीक घेता येऊ शकते. ही मानसिकता आजच्या पिढीत निर्माण करण्यासाठी संगमेश्वर तालुका ऍग्रो स्टार फार्म फ्रेश प्रोड्युसर लि. कंपनी विशेष प्रयत्न करत आहे.

याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील तुळसणी येथील तीन बचतगटातील महिलांना एकत्र आणून हळद लागवड करण्यात आली आहे. अंदाजे २० गुंठ्यांत एस. के. ४ या जातींच्या ३ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, आत्मा विभागाच्या मृणालिनी यादव यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. तसेच ऍग्रो स्टार कंपनीचे चेअरमन विलास शेलार यांनी एस. के. ४ या जातीच्या रोप लागवडीसाठी सखोल मार्गदर्शन केले असून, भविष्यातही अशा प्रकारचे शासकीय उपक्रम राबवण्याचा कंपनीचा मानस असल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 12/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow