चिपळुण : लॅपटॉप ऑनलाईन देतो सांगून तरुणाची ३ लाखांची फसवणूक

Jul 13, 2024 - 12:47
 0
चिपळुण :  लॅपटॉप ऑनलाईन देतो  सांगून तरुणाची ३ लाखांची फसवणूक

चिपळूण : ऑनलाईन लॅपटॉप पाठवून देतो, असे सांगून चिपळुणातील एका तरुणाला तब्बल ३ लाख ११ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. ही घटना १४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडली. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दि. ११ जुलै रोजी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत विठ्ठल गजानन काणेकर (२४, रा. कापसाळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अमनकुमार याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल काणेकर याने ऑनलाईन लॅपटॉप मागवून घेतला होता व त्याने एकूण ३ लाख ११ हजार रूपये संबंधिताच्या खात्यावर ऑनलाईन पाठवून दिले होते. मात्र, अनेक महिने प्रतीक्षा करूनदेखील लॅपटॉप न आल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow