अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अडकले लग्नबंधनात

Jul 13, 2024 - 12:47
 0
 अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अडकले लग्नबंधनात

जगभरातील दिग्गजांच्या मांदियाळीने सजलेला मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या धाकट्या लेकाचा लग्नसोहळा पार पडला आहे.

शुक्रवार 12 जुलै रोजी अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) हे दोघेही लग्नबंधनात अडकले. या सोहळ्याला सिनेसृष्टी, क्रिडाविश्व, बडे उद्योगपती, राजकीय नेते या सगळ्यांनी उपस्थिती लावली. जवळपास संपूर्ण बॉलीवूड या सोहळ्यासाठी उपस्थित होतं.

राधिका आणि अनंत यांचा विवाहसोहळा तीन दिवस पार पडणार आहे. 12 जुलै रोजी शुभ विवाह सोहळा, 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी बीकेसीमधील जिओ सेंटर येथे रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत राजकीय क्षेत्रातील अनेक बडे नेते वधु-वरांस आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं.

बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

लग्नाच्या पाहुण्यांनी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जोरदार डान्स केला. रेसलर जॉन सीना, रणवीर सिंह, संजय दत्त, जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर यांनी भरपूर डान्स केला. आई नीता अंबानी यांनीही मुलाच्या लग्नात डान्स केला. रात्री 9.30 वाजता लगन, सात फेरे आणि सिंदूर दानाचा विधी पार पडले.

दोन प्री वेडिंगचा घाट

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाकडून दोन प्री वेडिंगचे सोहळे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यांना जगभरातील दिग्गज व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. पहिला प्री वेडिंग सोहळा हा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. त्याचप्रमाणे दुसरा प्रीवेडिंग सोहळा हा परदेशात क्रूजवर पार पडला. त्यानंतर संगीत, हळद या सोहळ्यांना देखील अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 13-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow