बेदरकारपणे बोलेरो चालवत रिक्षाला धडक; गुन्हा दाखल

Jun 14, 2024 - 16:21
 0
बेदरकारपणे बोलेरो चालवत रिक्षाला धडक; गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे बोलेरो गाडी चालवून समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक देत अपघात केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार, ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वा. ओरी मठकरीफाटा येथे घडली होती. 

सिद्धेश विनायक देसाई (२४, रा. ओरी गावठणवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार किशोर जोशी यांनी तक्रार दिली.

त्यानुसार, ३१ मे रोजी सिध्देश देसाई आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच- ०८-एपी-६०११) ही जाकादेवी ते ओरी अशी भरधाव वेगाने घेऊन जात होता. त्याच सुमारास लहु जाधव (४५, रा. ओरी बौध्दवाडी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८-एक्यु ७७५७) घेउन समोरुन ओरी ते जाकादेवी जात होते. ही दोन्ही वाहने ओरी मठकरीफाटा येथे आली असता सिद्धेशचा तेथील उतारात गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडक देत हा अपघात केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow