मंडणगड : आंबडवे राजेवाडी रस्त्याची दुरवस्था

Jun 12, 2024 - 13:52
 0
मंडणगड : आंबडवे राजेवाडी रस्त्याची दुरवस्था

मंडणगड : मंडणगड तालुका युवासेना यांच्यावतीेन १० जूुन २०२४ रोजी तालुक्यात चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आंबडवे ते राजेवाडी रस्त्याच्या दुरावस्था बघता तसेच येत्या काही दिवसात चालू होणाऱ्या शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना कोणत्याही मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही यासाठी युवासेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदाराकडून लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

मागील महिन्यात अचानक उद्भवलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील जनतेचे झालेले अतोनात नुकसानीची भरपाई तसेच गेल्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या वादळातील नुकसानग्रस्ताना न मिळालेली भरपाई देखील लवकर मिळावी ह्या संदर्भात देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे, शिवसेना विभागप्रमुख इरफान बुरोंडकर,युवासेना तालुका सल्लागार नागेश घोसाळकर, सचिव प्रतीक पोतनीस, उपविभागधिकारी शुभम भोसले, शहराधिकारी आकाश सापटे, शहर संघटक अक्षय भगत, शहर सचिव योगेश जंगम, संतोष पार्टे, माजी सरपंच संदीप कदम, प्रणव गुहागरकर, ओंकार नटे, गणेश जोगी, शुभम राठोड आदी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow