रत्नागिरी : डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन

Jul 13, 2024 - 10:17
Jul 13, 2024 - 14:39
 0
रत्नागिरी : डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम २२ जुलै ते २२ ऑगस्ट या एक महिन्याच्या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत घेतला जाणार आहे. कामाच्या व्यस्ततेतून थोडा वेळ आपल्या आरोग्यासाठी रत्नागिरीकरांना देण्याची ही चांगली संधी आहे. हा अभ्यासक्रम एसटी स्टँडसमोरील अरिहंत मॉल येथील रत्नागिरी उपकेंद्रात होणार आहे. या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून, योगप्रकारांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे. अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी उपकेंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow