गणेशोत्सवात पावसाचीही साथ..

Sep 9, 2024 - 10:16
Sep 9, 2024 - 10:20
 0
गणेशोत्सवात पावसाचीही साथ..

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असून पावसाची सुरू असलेली ही रिपरिप गणेशोत्सवामध्येही कायम आहे. दिवसभरांमध्ये सरींवर असलेला पाऊस सायंकाळी बाप्पाच्या आरतीच्यावेळी नेमका बरसत असल्याने ओल्या चिंब अंगानेच गणेशभक्तांना श्री गणेशाच्या दर्शनासह आरत्या कराव्या लागत आहेत.

कधी दरडी तर, कधी मुसळधार असा कायमच लपंडाव खेळणाऱ्या पावसाने यावर्षी सातत्य राखले आहे. सुरुवातीला दमदारपणे लागणाऱ्या पावसाने श्रावणात दडी मारली होती. त्यामुळे गणेशोत्सवामध्येही पाऊस न येण्याची शक्यता गणेशभक्तांकडून वर्तविली जात होती. मात्र श्रावण संपताच पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाही पावसाने हजेरी लावली. दिवसभर सरींवर पाऊस कोसळत आहे. यामुळे भाविकांमध्ये थोडीशी नाराजी असली तरी शेतकरी राजा मात्र सरीवर पडणाऱ्या पावसामुळे आनंदी दिसत आहे. शहरी भागामध्ये रुजलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची आणि त्याबरोबरच 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना ग्रामीण भागामध्ये रुजलेली नाही. सार्वजनिक गणेशोत्सवांपेक्षा घरगुती गणपतींचेच प्रमाण जास्त आहे. या घरगुती गणपतीच्या सकाळी आणि दुपारच्या आरत्या घरातील माणसे करतात. मात्र या घरगुती गणपतींच्या सर्वांच्या सोयीनुसार सायंकाळी उशिरा गावागावांमध्ये, वाड्या-वाड्यांमध्ये गणपतीच्या सामूहिक आरत्या करण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये आहे. त्यामुळे गणपतीच्या आगमनापासून रोज सायंकाळी उशिरा वाड्या-वाड्यांमध्ये ढोलांच्या गजरामध्ये सामूहिक आरत्यांचे सूर घुमू लागले आहेत. या सामूहिक आरत्यावेळीच सायंकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना पावसाच्या पाण्याने ओल्या चिंब झालेल्या अंगानेच आरत्या कराव्या लागत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 09-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow