वाटद, मिरवणे ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकाराला केराची टोपली : नीलेश रहाटे

Jul 13, 2024 - 10:38
Jul 13, 2024 - 14:41
 0
वाटद, मिरवणे ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकाराला केराची टोपली :  नीलेश रहाटे

रत्नागिरी  : वाटद, मिरवणे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जनमाहिती अधिकाराला माहिती अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे नीलेश रहाटे यांनी केला आहे. या ग्रामपंचायतमध्ये राबवलेल्या योजनाची व घरपट्टीबाबत डिसेंबर २०२३ मध्ये ही माहिती मागितली होती. ती अद्याप दिली नसल्याचा रहाटे यांचा आरोप आहे. या संदर्भात जयगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

माहिती अधिकार २००५ नुसार माहिती अधिकारी म्हणून ग्रामसेवक रमेश डडमल हे काम पाहात आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख रहाटे यांनी ग्रामपंचायतीमध्ये काही राबवलेल्या योजनांची व घरपट्टीबाबत डिसेंबर २०२३ मध्ये माहिती मागितली होती; पण माहिती वेळेत न मिळाल्याने अपिलीय अधिकारी विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे यांच्याकडे जानेवारी २३ मध्ये अपिल केले. अपिलीय सुनावणीनंतर अपिलीय अधिकारी यांनी तक्रारदाराला १५ दिवसात माहिती देणे असे आदेश दिले. तरीही ही माहिती ६ महिने होऊनही मिळालेली नाही, असे रहाटे यांचे म्हणणे आहे. माहिती न मिळाल्यामुळे राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठमध्ये तक्रार नोंद केली आहे. जयगड पोलिस ठाणे, रत्नागिरी गटविकास अधिकाररी जे. पी. जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार व विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिलार्थीला माहिती न दिल्यामुळे व आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईप्रकरणी जयगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow