Ratnagiri : माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्काराकरिता आवाहन

Aug 23, 2024 - 10:31
Aug 23, 2024 - 10:31
 0
Ratnagiri : माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्काराकरिता आवाहन

त्नागिरी : माजी सैनिक, पत्नी, पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्काराकरिता येत्या २० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन पुण्याच्या सैनिक कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

या पुरस्काराकरिता राष्ट्रीय/राज्यस्तरीय खेळातील प्रमाणपत्रधारक, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारधारक, पूर, जळीत, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती भूकंप, वादळात बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, यशस्वी उद्योजक पुरस्कारप्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या तसेच दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवूण उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांचे पाल्य यांनी प्रस्ताव सादर करावेत. विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार म्हणून एकरकमी दहा हजार आणि पंचवीस हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत. पात्र माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी २० सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (०२३५२) २२२२७१) या दूरध्वनी क्रमांकाववर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 23-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow