चिपळूण : मर्सिडीजमधून बेकायदा मद्यवाहतूक; कारसह एकाला अटक

May 30, 2024 - 11:53
 0
चिपळूण : मर्सिडीजमधून बेकायदा मद्यवाहतूक; कारसह एकाला अटक

चिपळूण : चिपळूण शहरालगतच्या उक्ताड फाटा येथे साडेसहा लाखांच्या मर्सिडीजमधून विनापरवाना आणि बेकायदेशिर मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी एकाला आलिशान मर्सिडीज कारसह अटक केली आहे. अभिमन्यू रवींद्र वेल्हाळ (रा. शृंगारतळी, ता. गुहागर) असे या आरोपीचे नाव आहे.

या बाबत पोलिस हवालदार प्रितेश शिंदे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. २८ मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उक्ताड फाटा येथे घडली. 

या बाबत चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिमन्य रवींद्र वेल्हाळा हा आपल्या ताब्यातील मर्सिडीज सीआयडीमध्ये ७५ हजार रूपयांची बेकायदेशिर आणि विनापरवाना दारू ठेवून या मद्याची वाहतूक करीत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. यावळी तपासणी केली असता दारू सापडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी ७ लाख २४ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दारूच्या बाटल्यांसहीत कारचा देखील समावेश आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow