जगबुडी नदीपात्रात अडकल्या १६ म्हशी

Jul 15, 2024 - 10:29
Jul 15, 2024 - 12:29
 0
जगबुडी नदीपात्रात अडकल्या १६ म्हशी

खेड : मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी १२ जुलै रोजी सायंकाळी अचानक जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यावेळी अलसुरे गावातून जगबुडी नदीच्या बेटावर चरण्यासाठी गेलेल्या तब्बल सोळा म्हशी अडकून शेतकऱ्यांची चिंता वाढली.

जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत सायंकाळी ६ वाजल्यानंतर अचानक वाढ झाली. दुपारी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी अत्यंत कमी होती. यावेळी नदीच्या मध्ये असणाऱ्या छोट्याशा बेटावर अलसुरे आहेत.

गावातील शेतकऱ्यांच्या म्हशी चरण्यासाठी गेलेल्या म्हशी चरत असताना दोन्ही बाजूने अचानक नदीचे पाणी वाढल्यावर या सर्व १६ म्हशी त्या छोट्याशा बेटावर अडकून राहिल्या. या संदर्भात घाबरलेल्या शेतकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यालयाकडे धाव घेतली तसेच खेड़ पोलीस ठाण्यात देखील धाव घेतली आणि मदतीची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत अडकलेल्या म्हशी वाचवण्यासाठी अलसुरे गावातील शेतकरी सगळीकडे धावत होते. पावसाचा जोर नंतर कमी झाल्याने त्या सर्व म्हशी सुखरूप बचावल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow