चिपळूण- कराड मार्गावर दोन एस.टी. गाड्यांची समोरासमोर धडक

Jul 15, 2024 - 12:20
 0
चिपळूण- कराड मार्गावर दोन एस.टी. गाड्यांची समोरासमोर धडक

चिपळूण : चिपळूण कराड मार्गावर अलोरेनजीक भराडे येथे दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही चालक जखमी झाले असून दोन्ही गाड्यांचे समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. स्वारगेट गुहागर आणि खेड- कोल्हापूर या एसटी बस समोरसमोर धडकल्या. यामध्ये दोन्ही चालक जखमी झाले असून सुदैवाने प्रवाशांना मोठी दुखापत झालेली नाही. एसटीच्या समोरच्या बाजूच्या काचा फुटल्या आहेत. या दोन्ही एसटी गाड्या भरधाव वेगात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिस स्थानकात नोंद झाली नव्हती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 15/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow