महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे; किनारपट्टी, घाटमाथ्यावर मुसळधार

Jul 15, 2024 - 16:34
 0
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे; किनारपट्टी, घाटमाथ्यावर मुसळधार

पुणे : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार असून, किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तसेच देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे घाटमाथा ओलांडून पाऊस मध्य महाराष्ट्रापर्यंत दाखल झाला आहे. पुढील पाच दिवस किनारपट्टीवरील बहुतांश ठिकाणी, घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी मुसळधार असणार आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:03 15-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow