मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दाणादाण; नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

Jul 16, 2024 - 11:45
 0
मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दाणादाण; नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यला हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिलेला होता. त्यामुळे यादिवशी रत्नागिरी तालुक्यासह या पावसा जोर सोमवारी सकाळपासून कायम होता. नदय़ा-नाले तुंडुंब भरून वाहू लागले, तर पूरस्थितीने अनेक मार्गावर वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. पण दुपारी या पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने नागरिकांनी सुटका निश्वास टाकला. पण या पावसी संततधार कायम राहिलेली होती. पावसाने अनेक भागात पडझड, मार्ग बंद पडण्याया घटना घडल्याने लोकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागले.

या पावसाने मंडणगडमधील कुरार खेड रस्त्यावर झाड व दरड कोसळून वाहतूक बंद झाली होती, पण तो मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. खेड-दापोली मार्ग पाणी भरल्याने पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मंडणगडमध्ये मौजे भिंगलोली येथे संरक्षक भिंत कोसळून लगताया बिल्डींगमध्ये राहणारे सुभाष पांडुरंग सिंगारे व प्रमाद आनंदराव मोरे यांच्या फ्लॅटचे नुकसान झाले. दापोलीमध्ये जालगांव कुंभारवाडी येथील ज्ञानदेव लक्ष्मण आंजर्लेकर यांया घरो पत्रे वादळी वाऱयाने उडाल्याने अंशतः नुकसान झाले होते. खेडमधील भिलारे ऐन येथे पाण्यात म्हैस वाहून ती मृत झाल्यी घटना रविवारी घडली. शेलडी गावातील जयंत रामांद्र आंब्रे हा तरूण पोहण्यासाठी केला असता पाण्यात वाहून गेला होता. त्या मृतदेह रविवारी सकाळी मिळून आला. चिपळूणमधील सीटी रानडे पार्क पावर हाउसाच्या मागे भिंत कोसळून हनुमंत केशव तुडकर, मुकुंद केशव तुडकर, बाळू केशव तुडकर, रघुनाथ तुडकर यांया घरातील शेगडय़ा व भांडय़ो नुकसान झाले होते. चिपळूण येथील विष्णू धाकु गुडेकर यांया जुन्या घरो अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. गुहागरमम्धली पोरी आगर येथे रस्त्यावर आलेली दरड हटविण्यो काम सुरू होते. संगमेश्वर परुरी येथे गोपाळ गोणबरे यांया गोठ्याचे संरक्षक भिंत कोसळून अंशतः नुकसान झाले. देवाख नगर पांयत हद्दीतील दत्त मंदिर नजीक उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीवर झाड कोसळून पूर्णत: नुकसान झाले.

रत्नागिरी तालुक्यात रविवार, सोमवार अशा सलग दोन दिवसांत अनेक गावातील घरांना या फटका बसला आहे. तालुक्यातील मेर्वी गावातील घर, गोठय़ों मोठे नुकसान झालेले आहे. येथील प्रकाश दत्ताराम कुरतडकर यांया घरी पडझड होउन 53 हजार 350 रु. नुकसान झाले. रविंद्र कृष्णा कुरतडकर यांच्या घरो 12 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले. श्रीमती अपर्णा अनिल कुरतडकर यांच्या घरो 10 हजार 800 रुपयांचे नुकसान झाले आहे. रविंद्र रघुनाथ मेस्त्री यांया घरो 59 हजार 190 रुपयांचे नुकसान झालेले आहे. नारायण सदाशिव मेस्त्री यांया गोठय़ी मोठी पडझड होउन 34 हजार 460 रु. नुकसान झाले. सहदेव गंगाराम कुरतडकर यांया घरो 12,285 रु. एकनाथ नारायण गोठणकर यांया घरो 26 हजार 360 रु. तर श्रीमती मंगला शंकर मांडवकर यांच्या घराचे 30 हजार 215 रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात रविवारी जगबुडी, वाशिष्ठी या नदय़ांनी धोक्यी पातळी ओलांडलेली होती. मात्र सोमवारी या भागातील पावसा जोर थोडा ओसरल्याने नागरिकांसहृ प्रशासनस्तरा वरूनही सुटका निश्वास टाकण्यात आला. संगमेश्वरातील शास्त्री, सोनवी नदय़ा, तसा लांजातील काजळी नदी तर माकुंदी नदीने धोका पातळी ओलांडलेली होती. राजापूरातील कोदवली नदीही संगमेश्वर बावनदीही धोका पातळीजवळून वाहत होती.

जिल्हा प्रशासनस्तरावर नागरिकांच्या खबरदारी पावले उचलण्यात आलेली आहेत. धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या स्तलांतरासाठी कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्य़ात दापोली, चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यातील एकूण 61 कुटुंबातील 247 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. त्यामध्ये मंडणगडमधील 2 कुटुंबातील 10 लोकांना त्यांया नातेवाईकांया घरी हलवण्यात आले होते. खेडमध्ये 47 कुटुंबातील 184 लोकांना अन्यत्र हलविले. त्यामध्ये 52 लोकांना त्यांच्या नातेवाईक, 41 लोकांचे हाजी एस.एस.मुकादम हायस्कूल, 84 लोकों तटकरे हॉल, तर 7 लोकांचे अनंत कदम यांया घरी स्थलांतर करण्यात आले. चिपळूणमधील 8 कुटुंबांतील 42 लोकांचे नातेवाईकांया घरी तर गुहागरमधील 4 कुटुंबातील 11 लोकांचे नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करण्यात आले.

जिल्हाभरात मालमत्तांचे सुमारे 2 कोटी 59 लाख 38 हजारों नुकसान. या हंगामात 1 जूनच्या प्रारंभापासून आतापर्यंत जिल्हाभरात पडलेल्या पावसाने विविध ठिकाणी घरे, गोठे, तसा सार्वजनिक मालमत्ता, खासगी मालमत्ता, दुकाने यांची मोठी हानी झालेली आहे. त्यामध्ये अंशतः 129 घरे व पूर्णतः 2 घरांची पडझड झाली. त्यामुळे 74 लाख 11 हजार 746 घरों नुकसान झाले. पक्क्या स्वरूपातील अंशत 157 घरे व 8 पूर्णतः घरांचे 61 लाख 42 हजार 796 रुपयांचे नुकसान झाले आहे. अंशतः 35 गोठ्यांची पडझड होउन सुमारे 10 लाख 8 हजार रु. व पूर्णतः 8 गोठयांची पडझड होउन सुमारे 6 लाख 38 हजारो नुकसान झाले आहे. एकूण 51 सार्वजनिक मालमत्तांची पडझड झाल्याने सुमारे 47 लाख 25 हजारीं हानी झाली आहे. 39 खासगी मालमत्तांची पडझड झाल्याने सुमारे 30 लाख 84 हजारांचे नुकसान झालेले आहे. एकूण 35 दुकानांचे सुमारे 27 लाख 75 हजारों नुकसान झाले आहे. या पावसात 11 गायी/म्हशी अशी जनावरे मृत झाली. त्या मृत जनावरांमुळे संबधित मालकों 2 लाख 5 हजारांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्य़ात एकूण 21 गावांतील 62 शेतकऱयों 14.37 हेक्टरवरील नुकसान. या पावसाचा मोठा फटका जिल्हाभरातील शेतीलाही बसला आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे नदीकाठाया शेताचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये दापोली तालुक्यातील 11 गावांतील 79 शेतकऱयांच्या 7.98 हेक्टरवरील भातपिकांचे तर इतर 0.7 हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यातील 4 गावांतील 18 शेतकऱयांच्या 0.41 हेक्टरवरील भात क्षेत्राच्या नुकसान झाले आहे. संगमेश्व्रर तालुक्यातील 6 गावांतील 62 शेतकऱयांच्या 5.88 हेक्टवरील भात पिक व 0.03 हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्य़ातील सर्व राष्ट्रीय महामार्ग व घाटरस्त्यावरील वाहतूक सुरळीत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजातील वेरळ घाट, रत्नागिरीतील निवळी घाट, चिपळूणमधील कामथे घाट, परशुराम घाट, खेडमधील भोस्ते, कशेडी घाट महामार्गावरील वाहतूक सुरळीत असल्यो सांगण्यात आले. तर मिऱया-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दाभोळे घाट, आंबा घाट रस्ताही वाहतूकीसाठी सुरळीत होता. राजापूरमधील कोल्हापूरकडे जाणारा अनुस्कुरा घाट, चिपळूणमधील कराडमार्ग कुंभार्ली घाट देखील वाहतूकीसाठी सुरळीत होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow