चिपळूण, संगमेश्वर, देवरूखमध्ये महिलांसाठी लोकनृत्य, भजन स्पर्धा

Aug 10, 2024 - 16:44
 0
चिपळूण, संगमेश्वर, देवरूखमध्ये महिलांसाठी लोकनृत्य, भजन स्पर्धा

चिपळूण : राधा-गोविंद फाऊंडेशन पुरस्कृत मुक्तांगण आयोजित चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी पारंपरिक नृत्यकला व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळागौरी, टिपरी नृत्य आणि जाखडी नृत्य या तीन प्रकारात ही स्पर्धा होणार आहे.

१४ ऑगस्ट रोजी देवरूख विभागातील स्पर्धा नरसिंह मंगल कार्यालय देवरूख या ठिकाणी दुपारी १ वा. सुरू होईल. त्यासाठी प्रिया विचारे, अक्षता सावंत, गायत्री बने, मानसी करंबळे यांच्याकडे संपर्क साधावा. संगमेश्वर विभागाच्या स्पर्धा १६ ऑगस्ट रोजी दु. १ वा. विसावा मंगल कार्यालय खेरशेत येथे होतील. त्यासाठी रेश्मा डोंगरे, वैशाली पाटील यांच्याकडे संपर्क साधावा तर चिपळूण विभागाच्या स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी दु. १ वा. भाऊसाहेब महाडिक सभागृह, निकम हायस्कूल सावर्डे येथे होतील. त्यासाठी वर्षा खानविलकर व मीरा जोशी यांच्याकडे संपर्क साधावा. तालुकास्तरीय भजन स्पर्धा ३० ऑगस्ट रोजी भाऊसाहेब महाडिक सभागृह सावर्डे हायस्कूल या ठिकाणी होतील. विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार, १ हजार व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येकाला पंधरा मिनिटे वेळ दिला जाईल, सहभागी स्पर्धकांची संख्या पंधरा असावी, स्पर्धेचे बक्षीस वितरण त्याच ठिकाणी स्पर्धा संपल्यानंतर लगेच होईल. याबाबत अधिक माहितीसाठी सई सुर्वे- निकम, मीरा जोशी यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow