अमलीपदार्थांच्या विक्री विरोधात लांजा शहर समन्वय समितीकडून कारवाईची मागणी

Aug 7, 2024 - 10:45
Aug 7, 2024 - 13:50
 0
अमलीपदार्थांच्या विक्री विरोधात  लांजा शहर समन्वय समितीकडून कारवाईची मागणी

लांजा : लांजा शहरात अमलीपदार्थाची विक्री आणि सेवा या विरोधात मंगळवारी लांजा शहर समन्वय समितीच्या वतीने लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

लांजा शहरामध्ये राजरोसपणे काही सार्वजनिक ठिकाणी अमलीपदार्थ सेवन होत असल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. काहीजण याची विक्री करत असल्याचे निवेदन पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना देण्यात आले होते. परंतु, या निवेदनावर अमली पदार्थ सेवन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. या गंभीर प्रकाराबाबत पुन्हा पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

पुन्हा पोलिसांनी समाज घातक अमलीपदार्थ विक्री सेवा या विरोधात लांजा शहर समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांना निवेदन दिले. या संदर्भातील निवेदन देताना प्रकाश लांजेकर, प्रसन्न शेट्ये विठोबा लांजेकर, शौकत नाईक, गफार मुजावर, दिलीप मुजावर, मारुती गुरव, प्रमोद कुरूप, राहुल शिंदे, अकबर नाईक, लवू कांबळे, राजू लांजेकर, हेमंत शेट्ये, शेखर सावंत, गजानन गुरव, नागेश कुरूप, शरीफ नाईक, संजय लांजेकर, तुकाराम आग्रे आदींसह नागरिक उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow