विश्वजीत कदम फुटले असा आरोप करू नये, भास्करराव जाधव का बोलले? याचं आश्चर्य : बाळासाहेब थोरात

Jul 16, 2024 - 11:29
Jul 16, 2024 - 14:41
 0
विश्वजीत कदम फुटले असा आरोप करू नये, भास्करराव जाधव का बोलले? याचं आश्चर्य : बाळासाहेब थोरात

कराड : "विधानपरिषद निवडणुकीत (VidhanParishadElection) फुटलेल्या आमदारांबाबतचा योग्य निर्णय योग्य वेळी होईल. आमदारांवर काय कारवाई होणार हे दिल्ली ठरवेल.

विश्वजीत कदम फुटले असा आरोप करू नये. भास्करराव जाधव का बोलले याचं आश्चर्य आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक फडणवीस व अजितदादा यांच्या बरोबर झाली, याबाबत आम्हाला काही माहिती नाही. मात्र क्रॉस वोटिंग झालं हे मान्य करतो त्याचा अहवाल आम्ही पक्षाकडे पाठवलेला आहे", असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (BalasahebThorat) म्हणाले. थोरात यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महायुतीत बरीच गडबड आहे, महायुतीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत

बाळासाहेब थोरात म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली, महाराष्ट्र जाती-जातीत भेद झाला नाही पाहिजे यासाठीच भेटले असतील तर आनंदाची गोष्ट आहे. मात्र आता महायुतीत बरीच गडबड आहे, महायुतीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भुजबळ नेमके कशासाठी भेटले याचं कारण दुसरही असू शकतं. महाविकास आघाडी बद्दल चांगलं वातावरण आहे. हे सरकार ज्या पद्धतीने बनले तेच लोकांना मान्य नाही. सत्ता मिळवण्याकरता ज्या पद्धतीने माणसं फोडण्यात आली, हे जनतेला बिलकुल मान्य नाही. लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद विधानसभेला मिळेल. सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. जाती जातीत वाद होऊ नये.

भास्कर जाधव काय म्हणाले होते?

विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेस आमदारांनी विरोधात काम केलं हे स्पष्टच झालंय. मी थोडसं अधिक स्पष्ट बोलतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी काही केलं हे ठीक आहे. मात्र, त्यानंतर मी त्यांच्या मुलाखती पाहिल्या. त्या मुलाखतीमध्ये विशाल पाटलांच्या बोलण्यात संयम दिसत होता, पण विश्वजीत कदम यांच्या बोलण्यामध्ये उथळपणा दिसला. त्यांनी वाघ वगैरे नाचवला, हे शिवसैनिकांना रुचलेलं नाही. याचा अर्थ ते काँग्रेसने केलं असं आमचं मत नाही. ते विश्वजीत कदमांनी केलं. विधानपरिषद निवडणुकीत जे आमदार फुटलेत त्यांच्यामध्ये विश्वजीत कदम आहेत का? असा सवालही भास्कर जाधव यांनी केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow