राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार : आदिती तटकरे

Jul 16, 2024 - 12:37
Jul 16, 2024 - 12:42
 0
राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार : आदिती तटकरे

मुंबई : राज्यातील महायुती सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे.

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असेही आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महिना १५०० रूपये बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत. राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाणार आहेत. मात्र काही महिलांना बँकेमध्ये खाते नसल्याने त्यांना अडचण येते आहे. याच पार्श्वभूीवर ज्या महिलांची अजुनही बँक खाती नाही आहेत, त्यांना सहकार्य करत बँकांना खाते उघडून देण्यासाठी सहकार्य करावी आणि तसे आदेश बँकांना आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow