रत्नागिरी : जिल्ह्यातील ३३ धरणे तुडुंब..!

Jul 16, 2024 - 12:41
Jul 16, 2024 - 12:44
 0
रत्नागिरी :  जिल्ह्यातील ३३ धरणे तुडुंब..!

रत्नागिरी : यंदा जिल्ह्यात जूनपासून नियमित पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील ३ मध्यम व ६५ लघु पाटबंधारे प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. राजापूरमधील अर्जुना मध्यम प्रकल्पासह जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत तसेच ७ धरणांमध्ये ७५ ते ९९ टक्के, १६ धरणांमध्ये ५० ते ७५ टक्के आणि १३ धरणांमध्ये ० ते ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात १ जून ते १४ जुलै या कालावधीत १४६४ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात नातूवाडी (ता. खेड), गडनदी (ता. संगमेश्वर) आणि अर्जुना (ता. राजापूर) असे तीन मध्यम प्रकल्प आहेत तर जलसंधारण आणि पाटबंधारे विभागाचे मिळून एकूण ६८ लघु प्रकल्प आहेत. त्यापैकी चिपळूण येथील तिवरे धरण २०१९ ला फुटले तर अन्य तीन लघु प्रकल्प धोकादायक असल्यामुळे त्यात पाणीसाठा केला जात नाही. ९ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा ठेवला जातो. न मध्यम प्रकल्पांपैकी राजापूर तालुक्यातील अर्जुना प्रकल्पात आणि ३२ लघु प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा आहे.

गडनदी प्रकल्पात ८० टक्के आणि नातूवाडी प्रकल्पात ६८ टक्के पाणीसाठा आहे. ओव्हरफ्लो झालेल्या प्रकल्पांमध्ये अर्जुना मध्यम प्रकल्पासह चिंचाळी, चिडे, सोंडेघर, पंचनदी, शिरवली, शेलडी, कुरवळ, गुहागर, फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, मोर्डे, कडवई, रांगव, शिळ, व्हेळ, गवाणे, वेणी, मुचकुंदी, हर्दखळे, इंदवटी, कोडगे, अर्जुना म. प्र., बारेवाडी, ओझर, चिंचवाडी, गोपाळवाडी, वाटुळ चिंवाळी, चिडे, सोडेघर, सुकोडी, पंचनदी, शिरवली, शेलडी, कुरवळ, गुहागर, फणसवाडी, मालघर, अंडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, मोर्डे, कडवई, रांगव, शोळ, व्हेळ, गवाणे, बेणी, मुचकुंदी, हर्दखळे, इंदवटी, कोंडगे, अर्जुना म. प्र., बारेवाडी, गोपाळवाडी, वाटुळ या लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow