राजापूर : तुळसवडेत 'एक दिवसाचा पॉकेटमनी.. चिमुकल्यांसाठी' उपक्रम

Jul 16, 2024 - 10:49
Jul 16, 2024 - 16:51
 0
राजापूर : तुळसवडेत 'एक दिवसाचा पॉकेटमनी.. चिमुकल्यांसाठी' उपक्रम

राजापूर : सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचा फायदा हा समाजहितासाठीच होतो. असाच दृष्टिकोन समोर ठेवून राजापूर तालुक्यातील तुळसवडे क्र. १ शाळेचे शिक्षक सुग्रीव मुंडे यांनी 'एक दिवसाचा पॉकेटमनी.. चिमुकल्यांसाठी' हा उपक्रम आपल्या मित्रपरिवाच्या सहकार्यान यशस्वीपणे राबवला.

मूळ बीड जिल्ह्यातील असलेले सुग्रीव मुंडे हे राजापूर तालुक्यात गेली अनेक वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. शाळेतील विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि ती आपण कशी पूर्ण करू शकतो, याची माहिती त्यांनी आपल्या मित्रपरिवाराला सोशल मीडियावरून दिली. आणि त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरु झाला. जमलेल्या पैशांतून त्यांनी काही विद्यार्थ्यांसाठी छत्र्या, दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास, अंकलिपी अशा वस्तू खरेदी केल्या व त्याचे वाटप सुमारे ७० विद्यार्थ्यांमध्ये केले. त्यांच्याच शाळेतील विद्यार्थ्यांपुरता त्यांचा हा उपक्रम मर्यादित न राहता त्यांनी तुळसवडे केंद्रातील अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या उपक्रमात त्यांना शाळेतील सहकारी शिक्षक व मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले.

या उपक्रमातून एक गोष्ट खूपच समाधान आणि आनंद देऊन गेली. ती म्हणजे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य - सुग्रीव मुंडे, प्राथमिक शिक्षक, राजापूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:06 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow