खेडमध्ये पार्किंग व्यवस्थेअभावी वाहतूक कोंडी

Sep 10, 2024 - 13:34
Sep 10, 2024 - 14:06
 0
खेडमध्ये पार्किंग व्यवस्थेअभावी वाहतूक कोंडी

खेड : तालुक्यातील बसस्थानक, वाणीपेठ ते बाजारपेठ मुख्य रस्त्यावर वाहतू‌ककोंडीमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे तसेच फेरीवाले, अनधिकृत माल विकणाऱ्यांमुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत आहे. शहरात आचीच वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहतूककोंडीने कहर केला आहे. या समस्येकडे खेड पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे.

खेड शहराचा विस्तार होत असल्यामुळे त्याला आवश्यक पायाभूत पालिका प्रशासनाकडून उभारणीकडे लक्ष दिलेले नाही, अरूंद रस्ते, गटारे, पार्किंग सुविधा उपलब्ध नाही. गणेशोत्सवात चाकरमानी दाखल झाल्यामुळे खेड बाजारपेठेसह शहरातील वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

अरूंद रस्त्यामुळे जेमतेम दोन वाहने पुढे नेणे शक्य होते. रस्त्यांवर फेरीवाल्यांची संख्या वाढल्यामुळे अनेकवेळा कोंडी होते. रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. तिथे वाहतूक पोलिसरांची अनुपस्थिती असेल तर मात्र बराच काळ अडकून राहावे लागते तसेच रस्त्याच्या शेजारी वाहने उभी करून ठेवल्यामुळे वाहनकोंडीत भर पडते, पालिका प्रशासनाकडून रस्ते रुंदीकरण, फेरीवाले हटाव मोहीम आणि स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. वारंवार तक्रारी करूनही त्याकडे गांभीयनि पाहिले जात नाही. काही वाहनचालक वेगाने वाहने हाकत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे याचा सर्वाधिक फटका पादचाऱ्यांना बसतो आहे.

खेडमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे आणि वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी खेड नगरपालिकेने या संदर्भात योग्य नियोजन केल्यास ही समस्या निकाली निघू शकेल. अॅड. सैफ चौगुले

बसचालकांची कसरत
शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत, पालिका प्रशासनाने केवळ मोजक्याच परिसरातील खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. बसस्थानकाजवळील वळणामुळे बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात खड्यांची भर  पडल्यामुळे मार्गही एका बाजूने स आहे. अपघाताचे धोके वाढले अ रस्त्यावरून बस चालवणे चालक दृष्टोंने अडचणीचे झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:02 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow