परिवहन वाहनांच्या नूतनीकरण विलंब शुल्कला स्थगिती

Jul 16, 2024 - 10:24
Jul 16, 2024 - 16:28
 0
परिवहन वाहनांच्या नूतनीकरण विलंब शुल्कला  स्थगिती

रत्नागिरी : योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन ५० रुपये इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात आली आहे.

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणात विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्काची वसुली न करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने १० ऑक्टोबर २०१७ रोजीच्या आदेशान्वये स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका १००/२०२२ व रिट याचिका ११३८०/२०१७ एकत्रित सुनावणी घेऊन २ एप्रिल रोजीच्या आदेशान्वये स्थगिती आदेश उठविण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचे विलंब शुल्क प्रतिदिन ५० रुपये आकारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. हे विलंब शुल्क माफ करण्याबाबत ऑटोरिक्षा टॅक्सी चालक संघटना तसचे विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:51 PM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow