तुतारी एक्स्प्रेस १ जूनपर्यंत ठाण्यापर्यंच धावणार

May 30, 2024 - 13:41
 0
तुतारी एक्स्प्रेस १ जूनपर्यंत ठाण्यापर्यंच धावणार

रत्नागिरी : मध्य रेल्वेकडून मुंबईत घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे सावंतवाडी ते दादरदरम्यान दररोज धावणारी तुतारी एक्स्प्रेस १ जून २०२४ पर्यंत दादरऐवजी ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे.

सावंतवाडी येथून ही गाडी रात्री ८ वाजता सुटून ठाणे स्थानकात दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ४८ मिनिटांनी पोहोचेल. मुंबईत मध्य रेल्वेच्या हद्दीत विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. या कारणामुळे कोकणातून जाणाऱ्या विविध गाड्यांचे मुंबईत प्रवासाचे ठिकाण यामध्ये काही दिवसांपूर्वीच बदल जाहीर करण्यात आला आहे. या वावत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. २७ मे रोजी प्रवास सुरू होणाऱ्या आणि मुंबईत २८ मे रोजी पोचणाऱ्या फेरीपासून ते दि. १ जून २०२४ च्या फेरीपर्यंत सावंतवाडी रोड ते दादर तुतारी एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. 

तुतारी एकस्प्रचे थांबे : कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली नांदगाव, वैभववाडी, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, पनवेल व ठाणे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow