'मला फाशी द्या! मनुस्मृतीच्या विरोधात मी उभा राहणार' : जितेंद्र आव्हाड

May 30, 2024 - 13:57
 0
'मला फाशी द्या! मनुस्मृतीच्या विरोधात मी उभा राहणार' : जितेंद्र आव्हाड

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूल्य रुजावे यासाठी मनुस्मृतीच्या श्लोकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या याच निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाडयांनी महाडमधील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले.

यावेळी त्यांच्याकडून चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोडो फाडला गेला. या घटनेनंतर त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. हाच मुद्दा घेऊन भाजपकडून राज्यभरात आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. त्यांच्या प्रतिमेला काळे फासले जात आहे. यावर आता आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. काहीही झालं तरी मी मनुस्मृतीला विरोध करणार, असं आव्हाड यांनी ठणकावून सांगितलंय.

"जितेंद्र आव्हाड चुकला आहे. मी मोठ्या मनाने माफी मागितली"

97 वर्षांनंतर आम्ही त्याच जागेवर मनुस्मृती जाळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडला गेला. आमच्याकडून चूक झाली. आम्ही त्याच्याबद्दल माफी मागितली. आमच्यावर गुन्हेही दाखल झाले. मला फाशी द्या. मी मनस्मृती आणि सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे. मी मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे. जो जातीभेद, वर्षाश्रम, वर्षाश्रम, स्त्री द्वेषाची बिजे पेरली गेली, आपल्या समाजात स्त्रीला मान्यताच नव्हती. महात्मा ज्योतीबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही, असे मनुने लिहिलेले आहे. मनू काय बोलतोय त्याबद्दल बोला. जितेंद्र आव्हाड चुकला आहे. मी मोठ्या मनाने माफी मागितली आहे.

185 किलोमीटर लांब जाऊन फोटो फाडायला मी मुर्ख आहे का?

मला आनंद आहे की, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुषमा अंधारे, दलित पँथरचे दीपक केदार असे अनेकजण माझा उद्देश काय आहे हे बघा असे म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाड हे करूच शकत नाहीत. त्यांच्याकडून चुकून झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे. पण आव्हाड यांनी जाणूनबुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे, असं अनेक दलित समाजाचे कार्यकर्ते म्हणत आहेत. 185 किलोमीटर लांब जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडायला मी मुर्ख आहे का?

एका घटनेमुळे सगळ्या कार्यक्रमावर पाणी फिरलं

उलट आम्हालाच वाईट वाटत आहे की, सगळा कार्यक्रम चांगला झाला. पण शेवटी ती घटना घडली. त्या घटनेमुळे सगळ्यावर पाणी फिरलं. 97 वर्षानंतर कोणीतरी मनुस्मृतीचं दहन केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow