चिपळुणात भरदिवसा सदनिका फोडून दागिने चोरले

Jul 18, 2024 - 10:56
 0
चिपळुणात भरदिवसा सदनिका फोडून दागिने चोरले

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी येथील सुकाई कॉम्प्लेक्स येथे भरदिवसा सदनिका फोडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या सदनिकेतून चोरट्यांनी ३५ हजार रूपयांचे दागिने चोरले. 

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खेर्डी सुकाई कॉम्प्लेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर भाड्याने राहणारे मंगेश नाकटे हे हमाल पंचायतीमध्ये काम करतात. त्यांची पत्नीही घरकामाला जाते. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास त्यांची मुलगीही शाळेत गेल्याने सदनिका बंद होती. असे असताना सायंकाळी ५.३० च्या सुमारास शाळेतून घरी परत आल्यावर त्या मुलीला सदनिकेचे कुलूप तोडलेले दिसेले. तिने आपल्या आई-वडिलांना याची कल्पना दिली. यानंतर सदनिकेतून चोरट्याने ३५ हजार किंमतीचे दागिने लांबवल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून तपासकार्य केले. या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow