काळबादेवी येथे अवैधरित्या देशी, विदेशी दारु बाळगण्यावर गुन्हा दाखल

Jul 18, 2024 - 10:49
 0
काळबादेवी येथे अवैधरित्या देशी, विदेशी दारु बाळगण्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथे अवैधरित्या देशी, विदेशी दारु बाळगणाऱ्या संशयितावर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. 

मंगळवारी सायंकाळी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. जालंदर सदानंद मयेकर (४४, रा. काळबादेवी रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशी व विदेशी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काळबादेवी मयेकरवाडी येथे अवैधरित्या दारु विक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास काळबादेवी मयेकरवाडी येथे पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी संशयिताच्या ताब्यात पोलिसांना ५ हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या आढळल्या, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारु प्रतिबंध अधिनियम १९४९ चे ६५ ई नुसार गुन्हा दाखल केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow