'माझ्यावर आक्षेप.. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून तपास करावा' : मंत्री उदय सामंत

Jun 7, 2024 - 16:12
Jun 7, 2024 - 16:14
 0
'माझ्यावर आक्षेप.. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून तपास करावा' : मंत्री उदय सामंत

त्नागिरी : किरण सामंत (Kiran Samant) यांना उमेदवारी मिळाली नसल्याने मतदार नाराज होते, तरीही आम्ही नारायण राणेंना (Narayan Rane) 75 हजारांपर्यंत मताधिक्य दिलं, आता माझ्याच मतदारसंघावर दावा केला जातोय असं म्हणत उदय सामंत (Uday Samant) यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपच्या निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

उदय सामंत यांच्या मतदारसंघात नारायण राणे यांना कमी मतं मिळाली असं सांगत राणे कधीही माफ करत नाहीत असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला होता. त्याआधी आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून तपास करावा

राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, "माझ्या मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नसल्याने मतदार नाराज होते. त्यामुळें कदाचित त्यांनी ही नाराजगी मतांच्या स्वरूपात दाखवली. त्यानंतर ही नाराजगी थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो. मात्र सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम करत नारायण राणेंना निवडून दिलं. नारायण राणे यांच्या बाबतीत कोणीही वेगळं काम केलेलं नाही. त्यांना 75 हजार मतांपर्यंत आम्ही पोहचवलं हे नारायण राणेंना माहीत आहे. मात्र असं असताना देखील माझा मतदारसंघ भाजपसाठी मागणे किंवा माझ्यावर आक्षेप घेणे याबाबतीत मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे. फडणवीस यांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सुध्दा याबाबतीत माहिती घेतली पाहिजे."

उदय सामंत प्रचारात कमी पडले असतील तर ते सुद्धा दाखवून द्या असं आव्हान दिलं. ते म्हणाले की, "निलेश राणे यांच्यावर आक्षेप घेणे हे लोकशाही नुसार चुकीचे आहे. परंतु आमचा मतदारसंघ मागितल्यानंतर आता निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर महायुतीमध्ये बाधा येण्याची शक्यता आहे. याबाबतीत महायुतीच्या नेत्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे."

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow