जमातुल मुस्लिमीन लांजाच्या वतीने विशाळगडावरील हल्ल्याचा जाहीर निषेध

Jul 18, 2024 - 10:58
 0
जमातुल मुस्लिमीन लांजाच्या वतीने विशाळगडावरील हल्ल्याचा जाहीर निषेध

लांजाः विशाळगड येथील मलिकरेहान दर्ग्यावर तथाकथित लोकांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी जमातुल मुस्लिमीन लांजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन लांजा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

जमातुल मुस्लिमीन लांजाच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगड येथील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले हजरत पीर मलिक रेहान मिरासाहेब दर्ग्यावर दगडफेक आणि गजापूर येथील मशिद व मदरसावर झालेली दगडफेक, जाळपोळ तसेच पवित्र कुराण याची करण्यात आलेली विटंबना, भ्याड हल्ला व घरेदारे जाळून कधीही न भरून येणारे झालेले आर्थिक नुकसान, मुलाबाळांना व महिलांना करण्यात आलेली मारहाण, हिंदू-मुस्लिम एकोप्याला कलंक लावण्याचे करण्यात आलेले काम या वृत्तीचा आम्ही लांजा मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे म्हटले आहे. 

या प्रकरणी कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर आणि संघटनांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी. तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी आणि आमच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, हे निवेदन सादर करताना जमातुल मुस्लिमीन लांजाचे प्रमुख पदाधिकारी शौकत नाईक, गफार मुजावर, महंमद नाईक, सईद मापारी, हनिफ नाईक, अशरफ रखांगी, नजीर नेवरेकर, अब्दुल राहिमान मुजावर, फिरोज नाईक, अल्लाउद्दीन नेवरेकर, हाफिज ठाकूर, सोहेल मापारी, अकबर नाईक, मुन्ना नाईक, मोईप नाईक, महंमद पावसकर आदीं मुस्लिम बांधवांसह नितीन शेट्ये, अनिरुद्ध कांबळे व इतर मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow