ट्रक चालकाने परस्पर लांबवल्या २० लाखांच्या कॉपरप्लेट

Jul 19, 2024 - 11:46
 0
ट्रक चालकाने परस्पर लांबवल्या २० लाखांच्या कॉपरप्लेट

लांजा : सुमारे २० लाख रुपये किंमतीच्या २.५ टन कॉपरप्लेटची परस्पर लांबवून अपहार केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद सुरेश कुमार प्रेमचंद शर्मा (वय ४२, रा. हाऊस क्र. ४०६/२, फ्लॅट नं.यु एस २, पहिला मजला, अनंत रेसिडेन्सी, जयसी नगर फोंडा, गोवा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये ट्रक चालक अशोक म्हस्के (राहणार मु.पो.कोरेगवाण, ता.जिल्हा बीड, सध्या रा. बार्शी नाका बीड) हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक एम.एच.०९. एफ एल ७५४७) मधून २५९४९ किलोग्रॅम (२६ टन) कॉपरप्लेटचा माल १० बंडल हे फिनोलेक्स कंपनी उसगाव गोवा येथे घेऊन जात होते. चिपळूण आरवली येथे क्रॉसिंग केलेला ताब्यात देऊन पाठवण्यात आलेला असताना चालक मस्के याने ६ जुलै रोजी रात्री १० ते ७ जुलै रोजी सकाळी ८ या कालावधीत मालातील २४९८ कि.ग्रॅ. म्हणजे (२.५ टन) कॉपरप्लेट यांची एकूण २० लाख रुपये किंमतीची मालाची रितु रोडलाईन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या परवानगीशिवाय परस्प लांबवले. 

या प्रकरणी अशोक म्हस्ते याच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन् दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोली निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही. मैंदाड या करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow