राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी देवरूखच्या साहिल जागुष्टेची निवड

Jul 19, 2024 - 10:49
Jul 19, 2024 - 12:00
 0
राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी देवरूखच्या साहिल जागुष्टेची निवड

देवरूख : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व चंद्रपूर तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशनच्या मान्यतेने कॅडेट राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी देवरूखच्या साहिल जागुष्टेची निवड झाली आहे.

ही स्पर्धा दि. १९ जुलै ते २१ जुलै चंद्रपूर या ठिकाणी होणार असून, या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत. संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लबचा खेळाडू साहिल जागुष्टे हा खेळाडू पुमसे या प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. याबद्दल त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नगरपंचायत देवरूख, तायक्वांदो क्लब अध्यक्षा स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, उपाध्यक्षा पूनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, सदस्या स्वाती नारकर, रूपाली कदम, सीनिअर खेळाडू सौरभ बनकर यांसह प्रशिक्षक स्वप्निल दाडेकर, साईप्रसाद शिंदे, गायत्री शिंदे, सुमित पवार आदी उपस्थित होते. त्याला तालुका अॅकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, नगरपंचायत देवरूखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते आदींनी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow