Ratnagiri- गोवंश हत्या प्रकरण : आरोपीचा जामीन रद्द होण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा प्रस्ताव

Jul 19, 2024 - 12:50
 0
Ratnagiri- गोवंश हत्या प्रकरण : आरोपीचा जामीन रद्द होण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा प्रस्ताव

रत्नागिरी : गोवंश हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करावा, या मागणीचा प्रस्ताव रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी जिल्हा सरकारी वकीलांकडे दिला आहे. शादाब गनी बलबले असे आरोपीचे नाव असून, त्याला गेल्या सोमवारी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर तरतुदी तपासून सरकारी अभियोक्ता सहाय्यक संचालकांच्या मंजुरीनंतर जिल्हा न्यायालयात अपील दाखल होणार आहे.

एमआयडीसी मिरजोळे ते रेल्वे कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर गोवंशची कापलेली मान सापडली होती. गोमांसाची वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनातून हा प्रकार घडला असावा, असा संशय आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी क्रांतीनगर येथे राहणाऱ्या शाबाद बलबले याला अटक केली.

पोलिस कोठडीत असलेल्या या आरोपीला कोठडीची मुदत संपल्यानंतर गेल्या सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी ग्रामीण पोलिसांनी आरोपीला न्यायालयीन एमआयडीसी मिरजोळे ते रेल्वे कोठडी मिळण्यासाठी मागणी केली. परंतु तपास संपल्यानंतरच पोलिस कोठडीची मागणी होत नाही. त्याचबरोबर या तारखेवेळी ग्रामीण पोलिसांनी आरोपीला जामीन का देऊ नये याचे न्यायालयाला लेखी म्हणणे दिले गेले नाही. पोलिसांची ही तोंडी मागणी न्यायालयाने अमान्य केली. गुन्हा संवेदनशील आणि तितकाच गंभीर असल्याने आरोपी जामिनावर बाहेर राहणे योग्य नाही. आरोपी पुरावे नष्ट करण्याची आणि साक्षीदारांना फोडण्याची भीती असल्याने त्याचा जामीन रद्द व्हावा, यासाठी हे अपील केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow