संगमेश्वर : लोवले पडयेवाडी जि.प. शाळेच्या नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन

Jul 19, 2024 - 12:46
 0
संगमेश्वर : लोवले पडयेवाडी जि.प. शाळेच्या नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावाच्या जिल्हा परिषद लोवले पडयेवाडी येथील नवीन दोन वर्गखोल्यांचे उ‌द्घाटन मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी माझ्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करत असून तुमच्यासाठी जे विकासकाम लागेल ते करण्याची जबाबदारी माझी असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. लोवले गावाने जी जी विकासाची कामे मागितले ती पूर्ण करण्याचे काम तुमचा आमदार आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण केले असे ते म्हणाले. यावेळी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा पालकमंत्री यांनी घेत थेट उपस्थित महिलांना 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे किती लोकांनी अर्ज भरले, असा प्रश्न विचारला, यावेळी उपस्थितांपैकी कमी प्रतिसाद दिसल्याने अधिकाऱ्यांची योजना गावा गावांत पोहोचवण्याची मानसिकता नसल्याचे लक्षात आल्याने पालकमंत्री म्हणून मी गावागावांत जाऊन शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे.

ज्या भागात ऑनलाईनला अडचण होत असेल तर ऑफलाईन अर्ज भरण्याची सवलत शासनाने दिली आहे. कोणता अर्ज भरताना कोणी पैसे मागितले तर त्यांची तक्रार थेट माझ्याकडे करा, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश कुंभार यांनी केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेश मुकादम, रत्नागिरी तालुका प्रमुख बाबू महाप, विवेक शेरे, माधवी गिते, जमूरत अलजी, संदीप राहटे, सरपंच ऋतुजा कदम, संजय शिंदे, तहसीलदार अमृता साळवी, निलेश खापरे, नथुराम पडये, राजेश पड़ये, देवजी पड़ये, मुख्याध्यापक राजेश कांबळे, बाबू खातू यांसह ग्रामस्थ, पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow