गणपतीपुळेत हस्ताक्षर सुधार उपक्रम

Jul 19, 2024 - 10:14
Jul 19, 2024 - 15:17
 0
गणपतीपुळेत हस्ताक्षर सुधार उपक्रम

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्री ओम साई शांती ग्रुपच्या वतीने निवेंडी केंद्रातील सर्व प्राथमिक शाळांना मंगळवारी भेट देऊन हस्ताक्षर सुधार उपक्रम राबवण्यात आला. यावेळी निवेंडी केंद्रातील प्राथमिक शाळांच्या विद्याथ्यर्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षर विषयी विशेष जागृती ओम साई शांती ग्रुपच्या वतीने करण्यात आली.

या हस्ताक्षर सुधार उपक्रमामध्ये या ग्रुपच्यावतीने निवेंडी केंद्रातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सांगण्यात आले की, जे विद्यार्थी या दिलेल्या वहीमधून सुंदर हस्ताक्षर रेखाटतील त्या त्या विद्यार्थ्यांना तीन गटांमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक काढून ओम साई शांती ग्रुपच्या वतीने विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत ओम साई शांती ग्रुपच्या वतीने सुंदर हस्ताक्षर ही स्पर्धा परीक्षा घेऊन त्यामध्ये जे विद्यार्थी सुंदर हस्ताक्षर रेखाटतील त्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस दिली जाणार आहेत. 

या उपक्रमाबद्दल ओम साई शांती ग्रुपचे अध्यक्ष विनायक सावंत यांनी जागृती विद्यार्थ्यांमध्ये केली तसेच सर्व शिक्षकांना या उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत ओम साई शांती ग्रुपचे सदस्य पंढरीनाथ पोवार, संदीप रहाटे, अमोल गुरव, भरत घाणेकर, वैभव पवार, नीलेश चव्हाण उपस्थित होते.

हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल निर्वेडी केंद्रातील प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व सर्वन शालेय शिक्षकांनी ओम साई शांती ग्रुपचे कौतुक करून आभार व्यक्त केले. या हस्ताक्षर सुधार उपक्रमामध्ये निवेंडी केंद्रातील एकूण दहा प्राथमिक शाळांना भेटी देऊन जागृती करण्यात आली. त्यामध्ये गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, भगवतीनगर व निवेंडी या प्राथमिक शाळांचा समावेश होता. तसेच ओरी केंद्रातील तोगडेवाडी येथील प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये हस्ताक्षर सुधार उपक्रमाविषयी माहिती देऊन जागृती करण्यात आली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow