सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आज चिपळुणात

Jul 25, 2024 - 09:51
 0
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण  आज  चिपळुणात

चिपळूण : उत्तर रत्नागिरी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन गुरुवार, दि. २५ रोजी करण्यात आले असून, उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण व भाजपचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक सकाळी ११ वा. चिपळुणातील राधाताई लाड सभागृह (खेंड) येथे होणार आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवत संघटनात्मक ताकद वाढविण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रात तिसऱ्यावेळी मोदी सरकार आल्यामुळे भाजप परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे राज्यात भाजपला पाहिजे तशी प्रगती करता न आल्याची खंतदेखील व्यक्त होत आहे. राज्यात भाजप कुठे मागे पडला व कसा मागे पडला याचे प्रदेश पातळीवर नुकतेच पुणे येथील कार्यकर्ता शिबिरात विचारमंथन झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भापजच्याच नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीची रणनीतीची अंमलबजावणी करण्याकरिता दि. २५ जुलै रोजी चिपळुणात उत्तर रत्नागिरी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी ना. रवींद्र चव्हाण उपस्थित राहाणार आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow