कोल्हापूर : पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

Jul 19, 2024 - 17:18
 0
कोल्हापूर : पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पंचांगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल चार फुटाने वाढली असून दुपारी चार वाजता 33 फुटाच्या वरुन पाणी वाहत आहे. पंचगंगा इशारा पातळीकडे (39 फुट) आगेकुच करु लागली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. दुसरीकडे धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असल्याने धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे.

राधानगरी धरणांमध्ये 70 टक्के पाणीसाठा झाला असून आजपर्यंत (19 जुलै) 5.86 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील जंगमहट्टी, घटप्रभा आणि जांबरे तीन लघू प्रकल्प यापूर्वीच भरले आहेत. कडवी धरण 85 टक्के भरले आहे, तर कासारी धरण 70 टक्के भरले आहे. दुसरीकडे, अलमट्टी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अलमट्टी धरण भरण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने राधानगरीतून प्रतिसेंकद 1400, वारणातून 1546, कासारीतून 550, कुंभीतून 300, घटप्रभातून 6952 घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow