चिपळुणात आज मगरींच्या संचाराबाबत जनजागृती शिबिर

Jul 20, 2024 - 09:54
 0
चिपळुणात आज मगरींच्या संचाराबाबत जनजागृती शिबिर

चिपळूण : चिपळुणातील श्री देव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व वनविभाग यांच्या माध्यमातून आज शहरातील मगरींच्या वाढत्या संचाराबाबत अवेअरनेस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

हे शिबिर शनिवारी (दि. २०) सकाळी १० वा. वडनाका येथील एकविरा मंदिरात होणार आहे. चिपळूण शहर परिसरात मगरींचा संचार आता थेट नागरी वस्तीत सुरू झाला आहे. मध्यंतरात पहाटेच्या दरम्यान भली मोठी मगर शिव नदी पुलावरून बाजारपेठ मार्गावर वावरताना निदर्शनास आली. त्याहीपूर्वी शहर परिसरातील नागरी वस्तीत मगरी मुक्तपणे शिरकाव करीत असल्याचे दिसून आले. परिणामी, शहरातील नागरिकांमध्ये गैरसमज व भीतीचे वातावरण निर्माण झाले. या बाबत जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण वन विभागीय कार्यालय व चिपळुणातील श्रीदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वडनाका एकविरा मंदिर येथे शिबिर होणार आहे. यावेळी वन विभागामार्फत सहभागींना मगरींविषयी माहिती देण्यात येणार आहे व शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow