देवरुखमध्ये झाड कोसळून चारचाकीचे नुकसान

Jul 17, 2024 - 13:12
 0
देवरुखमध्ये झाड कोसळून चारचाकीचे नुकसान

देवरुख : शहरातील सोळजाई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दत्तमंदिराजवळ झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. या घटनेत रस्त्याच्या बाजूला उभी असणारी कार झाडाखाली दबून पूर्ण गाडीचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. माणिक चौक परिसरातील जुने निवाचे झाड दुपारी २.३० च्या दरम्याने उन्मळून पडले. याच झाडाखाली संजय शेडगे यांची स्विफ्ट डिझायर उभी होती. या गाडीवरच झाड पडले. झाडाचे मुख्य खोड गाडीवर पडल्याने पूर्ण गाडी दबून नुकसान झाले आहे.

संगमेश्वरात रविवारी मुसळधार पाऊस सायंकाळपर्यंत कोसळत होता. पावसाचा जोर असल्याने शास्त्री, सोनवी, गडगडी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. यात संगमेश्वर देवरुख मार्गावरील बुरंबी गेल्येवाडी येथे सोनवी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:37 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow