आंजणारीतील दत्त मंदिराला पुराचा वेढा

Jul 22, 2024 - 10:19
 0
आंजणारीतील दत्त मंदिराला पुराचा वेढा

लांजा : लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीला आलेल्या पुराने नदीकाठच्या आंजणारी मंदिर, श्री क्षेत्र अवधूतवन स्वयंभू दत्तस्थान मठ मंदिराला पाण्याचा वेढा पडल्याने रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द झाल्याचे मंदिर ट्रस्टचे सुभाष पवार यांनी सांगितले. 

लांजा तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने काजळी, मुचकुंदी, नावेरी या नद्यांना पूर आला आहे. काजळी नदीची इशारा पातळी १६.५० आहे, तर धोका पातळी १८.५० मीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पूल हा ब्रिटिशकालीन पूल असून, १०० वर्षे झाल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक ठरला आहे. नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात येते. दरम्यान, आंजणारीजवळील मठ दतमंदिरला पुराच्या पाण्यात वेढा पडल्याने भाविकांनी दर्शनासाठी न येण्याचे आवाहन करण्यात आले होते.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow