कागदी पुठ्ठे, पेपरपासून साकारले मार्लेश्वर मंदिर

Sep 12, 2024 - 11:05
 0
कागदी पुठ्ठे, पेपरपासून साकारले मार्लेश्वर मंदिर

रत्नागिरी : गणेशोत्सवात गणरायाच्या आगमनात मखर, देखावा तयार करण्याची क्रेझ वाढत जात आहे. त्यात पर्यावरणपूरक देखावे साकारताना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करुन नोकरी संभाळत देवरुख (ता. संगमेश्वर) येथील प्रसिद्ध आणि पुरातन श्री मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती जशास तशी उभारली आहे. यासाठी कागदी पुठ्ठे, पेपर, सिल्व्हर फॉईल यांचा वापर त्यांनी केला आहे. ही कलाकूसर पाहण्यासाठी मिरजोळे-लक्ष्मीकांतवाडी येथील कलाकार आशिष अविनाश वाडकर यांच्या घरी भक्तगणांची गर्दी होत आहे.

आशिष वाडकर गेली सहा वर्षे पर्यावरणपूरक देखावे करत आहेत. गतवर्षी जेजुरीचा देखावा त्यांनी साकारलेला होता. यंदा पुठ्ठे, कागद, सिल्व्हर फॉईल यांचा वापर करुन मार्लेश्वर मंदिर जशास तसे उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मे महिन्यात मार्लेश्वरला जाऊन त्या परिसराची माहिती घेऊन आले. त्यानंतर संपुर्ण वाडकर कुटुंबाची अपार श्रद्धा असलेल्या मार्लेश्वर मंदिराचा देखावा उभा करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी पंचम उमेश वाडकर, मुलगे रुद्र आशिष वाडकर, ध्रुव आशिष वाडकर यांचे सहकार्य लाभले. दहा बाय बाराच्या खोलीत बांबूच्या साह्याने मंदिराच्या बाहेरील परिसराची रचना तयार केली. त्यानंतर कागद, पुट्ठे लावून त्याला रंग दिला आहे. श्री मार्लेश्वर चे दर्शन घेण्याचे प्रवेशद्वार, गांगकुंड, साप, मार्लेश्वराची पिंडी त्यांनी तयार केली आहे. मार्लेश्वर मंदिर (गुहा) देखाव्याला जिल्ह्यातून विविध पारितोषिकं मिळाली आहेत.

हा देखावा उभा करताना फारसा खर्च झाला नाही. नोकरी संभाळून हे काम केले. गणेश आगमनापर्यंत पर्यावरण पुरक देखावा तयार झाला. गणेशभक्तांकडून आमच्या कलेची पोच पावती मिळत आहे. - आशिष वाडकर, मिरजोळे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow