रत्नागिरीचा महिला कबड्डी संघ उपविजेता

Jul 22, 2024 - 10:13
 0
रत्नागिरीचा  महिला कबड्डी संघ उपविजेता

खेड : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी बाणेर पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम फेरीचा सामना पुणे ग्रामीण विरुद्ध रत्नागिरी जिल्हा असा झाला. यामध्ये २४ विरुद्ध २८ गुण फरकाने पुणे जिल्ह्याने रत्नागिरीवर मात केली.

संपूर्ण स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघाने उत्कृष्ट खेळ केला व क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले, रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रत्नागिरीचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. संघातील आघाडीच्या राष्ट्रीय खेळाडू समरीन बुरोंडकर, सिद्धी चाळके, तस्नीम बुरोंडकर, प्रतीक्षा चव्हाण, सुप्रिया थोरे, गौरी कदम, दिव्या सकपाळ, चिन्मय ढगळे, मुग्धा शिर्के, दीपाली कांबळे, गौरी जाधव, सारा शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ केला.

यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षक दाजी राजगुरू व व्यवस्थापक संपदा गुजराथी यांचे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष व पालकमंत्री उदय सामंत, कार्याध्यक्ष मंगेश बाबू, उपाध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, नेत्रा राजेशिर्के, संतोष धामुस्टे, मंगेश मोरे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे खजिनदार अभिजित सप्रे, माजी अध्यक्ष सचिन कदम, माजी सचिव व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह रवींद्र देसाई यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow