चिपळुण : अरबी समुद्रातील भरतीपूर्वी कोयनेतील वीज निर्मिती बंद

Jul 22, 2024 - 10:53
Jul 22, 2024 - 10:58
 0
चिपळुण : अरबी समुद्रातील भरतीपूर्वी कोयनेतील वीज निर्मिती बंद

चिपळूण : शहरात रविवारी पहाटेपासून मुळधार पावसाने होता मात्र कुठेही पाणी साचले नाहीं हे विशेष अरबी समुद्रात भरती येण्यापूर्वी कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती बंद केली जात होती. त्यामुळे कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीत येत नव्हते. ओहोटी सुरू झाल्यानंतर कोयना प्रकल्पाचे काही टप्पे सुरू करून कोळकेवाडी धरणातील पाण्याची पातळी कमी केली होती. पाणी साचत असलेल्या ठिकाणी पालिकेने काही उपाययोजना केल्या. त्याचा परिणाम जार दिसून आला रविवारी दिसून आला.

रविवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. धो-धो पाऊस पडत असल्याने प्रशासन सतर्क झाले होते. आपती निवारण पथक तसेच एनडीआरएफची टीम सज्ज ठेवली आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत वाशिष्ठी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली राहिली. रविवारी पौर्णिमची भरती होती. २०२१ मध्ये पौर्णिमेच्या  भरतीच्या वेळी शहरात महापूर आला होता त्यामुळे पालिकेने रविवारी विशेष काळजी होती. दरी १.१० वाजता भरतीला सुरुवात झाली. त्यानंतरचे दोन तास महत्वाचे असल्यामुळे प्रशासन सतर्क होते. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले होते. ग्रामीण भागातील नागरिकही रविवारी खरेदीसाठी चिपळूणला आले नाही. दुपारी एक वाजता वाशिष्ठीची पाणी पातळी ४.९० इतकी होती. अरबी समुद्राला ओहोटी लागल्यानंतर हळूहळू कमी झाली. मार्कंडीसह शहरातील ज्या भागात पाणी साचते त्या ठिकाणी आज सफाई कामगार तैनात केले होते. पाऊस कमी झाल्यानंतर तेथील गटारांची तातडीने स्वच्छता केली जात होती. दिवसभरात सहा ते सात वेळा गटार स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे पाणी साठवून राहिले नाही. तसेच काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने चर मारून पाण्याला मार्ग काढण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow