रत्नागिरीत साईडपट्ट्या भरण्यास सुरुवात

May 31, 2024 - 10:09
 0
रत्नागिरीत साईडपट्ट्या भरण्यास सुरुवात

रत्नागिरी : शहरवासीयांना त्रासदायक ठरणाऱ्या साईडपट्ट्यांचे काम सुरू झाले आहे. यामुळे रस्त्याचेही रुंदीकरण होत असल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून क्रॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सुमारे ९६ कोटींचे हे काम असून सहा मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय होते. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते खड्ड्यात जातात. याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो. पालिका यावर मलमपट्टी करते किंवा दरवर्षी नवीन डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. वारंवार होणाऱ्या या तक्रारींवर उपाय म्हणून शहरातील काही हे रस्ते क्रॉक्रिटीकरणाचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकदाच हे रस्ते झाले म्हणजे वारंवार रस्ते दुरुस्तीचा विषय नको, म्हणून ९६ कोटींचा निधी काँक्रिटीकरणासाठी मंजूर झाला. शहरात साळवी स्टॉपपासून या रस्त्यांना सुरुवात झाली. त्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 31-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow