स्वरूपानंद ग्रंथालयाची वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

Jul 23, 2024 - 14:06
 0
स्वरूपानंद ग्रंथालयाची वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : येथील स्वरूपानंद ग्रंथालय कुवारबाव परिसर रत्नागिरी तर्फे कुवारबाव मधील चार मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मराठी शाळा उत्कर्ष नगर येथे ज्येष्ठ कीर्तनकार सौ सुरेखा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष विनायक हातखंबकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून गुरुपौर्णिमेनिमित्त मुलांशी संवाद साधला. अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली आणि मुलांमध्ये सभाधिट पणा यावा म्हणून वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्या  सुरेखा जोशी यांनी गुरु शिष्याच्या नात्याची जपणूक कशी करावी हे सांगताना रामदास स्वामी आणि त्यांचा शिष्य अज्ञान यांची गोष्ट मुलांना आवडेल अशा साध्या सोप्या रसाळ भाषेत सांगितली.

वक्तृत्व स्पर्धा लहान व मोठा गट अशी घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधून पूर्वा गोरे, अमेय पाटील, अर्णव शिंदे

मराठी शाळा उत्कर्ष नगर मधून राधा पावरी, ऋचा पावरी, रुद्र जांभळे, आयुष्य यमगर तर मोठ्या गटातून अनन्या पेडणेकर, श्रेया पांचाळ, दिव्या जाधव.

मराठी शाळा महालक्ष्मी नगर मधून स्वप्निल चौरे, गुंजन प्रजापती,धनश्री मिस्त्री मोठ्या गटातून सावरी दुदम, अलिषा ऐवाळे, गुरुप्रसाद लोहार,

मराठी शाळा रवींद्र नगर मधून रोहित गवळी, रिशिका मोरे, प्रांजळ वरक तर मोठ्या गटातून गौरी पाटील, सुकृती हनबारे, निलेश्वरी गावडा यांनी बक्षिसे पटकावली.

ही वक्तृत्व स्पर्धा बौद्ध वासी लक्ष्मण गोविंद पवार गुरुजी यांच्या स्मरणार्थ घेण्यात आली होती. त्यासाठी सीमा पवार यांनी सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक सहाय्य केले.

शाळेच्या विविध गरजा लक्षात घेऊन माजी केंद्रप्रमुख विनायक हातखंबकर यांनी रुपये दहा हजार मुख्याध्यापिका शिवलकर यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप रेडकर यांनी पहिली ते सातवी मध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख  बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मधु शिवलकर, शिक्षक वृंद, ग्रंथालयाच्या पूजा संनगरे, प्रज्ञा मावळकर, सीमा पवार, दिलीप रेडकर, श्रीकांत पाटील, विनायक हातखंबकर, उमेश राऊत यांचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow