रत्नागिरी : ऑगस्टमधील अनियमित पावसामुळे भातशेतीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव

Aug 29, 2024 - 16:26
Aug 29, 2024 - 17:14
 0
रत्नागिरी : ऑगस्टमधील अनियमित पावसामुळे भातशेतीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत महावेध प्रणालीद्वारे होत असलेल्या नोदणीनुसार जिल्ह्यात सरासरी ११ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी सरासरी ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. गतवर्षी पाच कालावधीत २४८१ मिमीची नोंद झाली होती. यंदा सुरुवातीचे दोन महिने भातशेतीला पूरक पाऊस होता, मात्र ऑगस्टमध्ये पडलेल्या अनियमित पावसामुळे भातशेतीवर कीडरोगांचा प्रादुर्भाव  झाला. त्याचा मोठा फटका उत्पादनावर बसणार नाही, असे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आहे.

जिल्ह्यात दूरपासून २८ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३१०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात ३३०९, तर सर्वांत कमी पाऊस रानागिरीत २९६६ मिमी इतका पडला आहे ३ महिने पूर्ण होण्यापूर्वीच सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाउस झाला आहे. जिल्ह्यातील धरणे भरू लागली आहेत, कोकणात चार महिने पावसाचे आहेत जनून एक महिना शिल्लक आहे परिणामी, सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे भातपेरणीला सुरुवात झाली परंतु जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घेतलेल्या विश्रांतीमुळे भात पुनर्लागवडीला आठ दिवसांचा विलंब झाला, तरीही जिल्ह्यात यंदा सुमारे ४० हजार हेक्टरवर भाताची पुनर्लागवड करण्यात आली आहे पुढे पावसाचे वेळापत्रक सुरळीत राहिल्यामुळे बळीराजाहि आनंदित होता.

ऑगस्टाच्या दुसऱ्या आठवडयात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकन्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्या होत्या. कातळावरील शेती पूर्णतः सुकली होती. करपा, निळे भुंगेरे आदी प्रकरच्या रोगांचा प्रादुर्भाव सुरु झाला. काही ठिकाणी भात उत्पाद‌नावर परिणाम होण्कर आहे मात्र हे प्रमाण तुलनेत कमी आहे. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पडल्यामुळे कीडरोगांना वेळीच आळा बसला अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागते असते.

दोन लाख प्रवाशांची सोय
दोन यत्रणातील नोंदीत तफावत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची नोद प्रशासनाकडून दोन वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे घेतली जात आहे. त्यामध्ये महारैन प्रणालीनुसार जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी ३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. महावेध प्रणालीनुसार ३१०५ पावसाची नोंद झाली. दोन्हीमध्ये सुमारे ४०० मिमीची तफावत पाहायला मिळते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow