विषारी औषध प्राशन केलेल्या वळके येथील महिलेचा मृत्यू

Jul 24, 2024 - 10:18
 0
विषारी औषध प्राशन केलेल्या वळके येथील महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी तालुक्यातील वळके पाली येथे अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सी. पी. आर रुग्णालयात मृत्यू झाला. श्रावणी श्रीकांत गोरे (३२, रा. वळके पाली, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

काही दिवसांपूर्वी राहत्या घरी अज्ञात कारणातून तिने इनफिल्ड नावाचे विषारी औषध प्राशन केले होते. काहीवेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिला प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेले होते. तेथील सी.पी.आर रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी श्रावणीचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 24-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow