मंडणगडात रस्त्यावरील जुन्या पुलाचा भराव खचल्याने तीन गावांतील वाहतूक विस्कळीत
मंडणगड : मंडणगड शहरातील गांधी चौकातील पाच नगरपंचायत प्रभागात जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या पुलाचा भराव खचल्याने कोंझर, अडखळ, टाकवली या गावांतील वाहतूक विस्कळित झाली आहे. मोरीवजा असलेल्या या छोट्या पुराचा भराव खचल्याने रस्त्यावरून वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने या गावांतून येणाऱ्या वाहनांना गांधी चौक, दापोली पोलिस चेक पोस्ट, असा तीन किमीचा मोठा वळसा मारुन बसस्थानक व अन्य शासकीय कार्यालये गाठवी लागत आहेत.
वाढलेल्या अंतरामुळे मंडणगड शहरापासूनचे कोंझर या गावाचे अंतर पाच किमी, अडखळ या गावाचे अंतर आठ किमी, तर टाकवली या गावाचे अंतर अकरा किमी इतके झाले आहे. मोरीवरून वाहतूक सुरू असताना अंतर तीन किमीने कमी होते. मंडणगड गाठण्यासाठी या तिन्ही गावातील नागरिकांना एकतर पाणी यावे लागते किंवा वाहनाने तीन किमीचा वळसा मारावा लागतो. गेल्या काही वर्षापासून स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी गांधी चौक रस्त्यावरील जुना पूल खचला असल्याने या पुलाची दुरुस्तीचे मागणी करत होते. हा रस्ता नगरपंचायतीचे अखत्यारित असल्याने नगरपंचायत प्रशासनाने या समस्यकेडे वेळेवर लक्ष दिले असते ही समस्याच निर्माण झाली नसती व नंतरची गैरसोयही टाळता आली असती.
नगरपंचायतीचे कार्यक्षेत्र विजय स्टोअर्स ते दापोली फाटा पोलिस चेक पोस्ट ते पोलिस चेक पोस्ट गांधी चौक रस्ता गांधी चौक ते मंडणगड धनगर वाडी व किल्ले मंडणगड रस्ता मंडणगड ते कोंझर रस्ता, मंडणगड ते सुलें निवळी नदी रस्ता, मंडणगड बाजारपेठ ते गांधी चौक रस्ता, हे सुमारे दोन ते चार किमीच्या सात रस्त्यांचा समावेश झाला आहे. अन्य प्राधिकरण व शासकीय विभागाकडे असलेल्या नमूद रस्त्यांचे अंतर नगरपंचायतीचे ताब्यात आहे. नगरपंचायतीने देखभाल व दुरुस्ती करून काही रस्ते नव्याने करूनही बहुतांश रस्त्यांची यंदाचे पावसात दूरवस्था झाली आहे. त्यात आता नादुरस्त पुलाची भर पडली आहे. त्यामुळे किमान चार गावातील जनजीवनही प्रभावित झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 24/Jul/2024
What's Your Reaction?