स्वा. सावरकर नाटयगृहात आज 'त्रिवार जयजयकार' कार्यक्रम

Jun 15, 2024 - 10:52
 0
स्वा. सावरकर नाटयगृहात आज 'त्रिवार जयजयकार' कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये 1999 साली पुण्याच्या माहेरवाशिण असलेल्या सौ. रुपाली लिमये यांनी कै. यशवंतराव पटवर्धन अकॅडमी तसेच टिळक आळीतील महिला मंडळामध्ये कथक नृत्य वर्ग सुरु केले. 

कुशलव रामायण गाती हा पहिला कथक नृत्याने सादर केलेला मोठा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर विविध कार्यक्रम सादर केले. नुकताच 25 फेब्रुवारी रोजी वल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया हा मानाचा सन्मान मिळाला. वेदश्री कथक नृत्यलयाला 25 वर्ष पूर्ण झाली. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्रिवार जयजयकार हा राम गीतावर आधारित कार्यक्रम स्वा. सावरकर नाटयगृहात शनिवार 15 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता सादर होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असं आवाहन वेदश्री कथक नृत्यालयाच्या संचालिका गुरु. रुपाली लिमये यांनी केले आहे. कार्यक्रम विनामूल्य आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow